ब्रेकिंग

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करा – ना. विखे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करा – ना. विखे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जाहिरात मो-7756045359

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करा – ना. विखे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोणी । प्रतिनिधी । सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचा कोणताही सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय मी केला असून, या सत्काराच्या खर्चाचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी करावा. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करूयात असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण देत असलेल्या शुभेच्छा मला नेहमीच ऊर्जावान ठरल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छारूपी पाठबळामुळेच काम करण्याची प्रेरणा सातत्याने मिळाली आहे. यंदाच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पहार, बुके आणि इतर भेटवस्तू न स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला असून, कार्यकर्त्यांनीही फ्लेक्सबोर्ड लावून शुभेच्छा देण्याचा अनावश्यक खर्च टाळावा.या रकमेतून समाजातील गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, वह्या, दप्तरे किंवा अन्य शालेय साहित्य आपण भेट म्हणून उपलब्ध करून द्यावे, तुमच्या छोट्याशा मदतीमुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग यशस्वी होईल यासाठी मी हे आवाहन करीत आहे. ज्यांना या सामाजिक उपक्रमात वस्तुरूपी योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी लोणी येथील प्रवरा कन्या मंदिर येथील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियममध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये शालेय साहित्य दिनांक १० जून ते १५ जून २०२६ या कालावधीत जमा करावे. आपले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत पण वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी ठेवून आपण सर्वजण मिळून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प करू.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!