ब्रेकिंग
जुन्नर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी – सत्यजित तांबे

जुन्नर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी – सत्यजित तांबे

जुन्नर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी – सत्यजित तांबे
संगमनेर । प्रतिनिधी । जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे नराधम वावरत आहेत, आपल्या मुलींवर सातत्याने अत्याचारांची टांगती तलवार आहे. ही बाब मला केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून धक्का देणारी आहे.पिंपळवंडीतील त्या नराधमाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या चिमुकलीने किती यातना भोगल्या असतील, तिचे आई-वडील आता कोणत्या परिस्थितीतून जात असतील याची कल्पनाही करवत नाही. अशा अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषी नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी शासनाकडे आग्रहाची मागणी आहे. असे आ. सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे



