जुन्नरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक: दोषींना फाशीची शिक्षा व्हावी- बाळासाहेब थोरात

जुन्नरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक: दोषींना फाशीची शिक्षा व्हावी- बाळासाहेब थोरात

जुन्नरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक: दोषींना फाशीची शिक्षा व्हावी- बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक, दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, माणुसकीला काळिमा फासणारी जुन्नर येथील घटना आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करतो. या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि जलद चौकशी करून दोषी नराधमावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी व तत्पर अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित राहील, यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत असेही ते यावेळी म्हणाले.