ब्रेकिंग

ज्ञानेश्वरी हे महाकाव्य मानवतेला दिशा देणारे – सौ.दुर्गाताई तांबे

अमृतेश्वर अखंड हरिनाम सप्ताह दीपोत्सव संपन्न

ज्ञानेश्वरी हे महाकाव्य मानवतेला दिशा देणारे – सौ.दुर्गाताई तांबे

जाहिरात मो-7756045359
अमृतेश्वर अखंड हरिनाम सप्ताह दीपोत्सव संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा असून विविध जाती धर्मातील संतांनी प्रेमाचा व समतेचा संदेश सर्वांना दिला आहे. ज्ञानेश्वरी पारायण हा अमृता अनुभव असून ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे महाकाव्य संपूर्ण विश्वाला दिशादर्शक असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांनी म्हटले आहे तर ज्ञानेश्वरी हे महाकाव्य जगाला दिशा देणारे असल्याचे सौ दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिरात 41 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ.कांचनताई थोरात, कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पा घुले, ह.भ.प गोविंद महाराज करंजकर, ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे, संचालक सौ.लताताई गायकर, ॲड.बाबासाहेब गायकर, ॲड.अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे,कार्याध्यक्ष रामदास तांबडे, ह.भ.प.अरुण जोंधळे, संदीप दिघे,राजू बड यांच्यासह अमृत सांस्कृतिक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी सौ.कांचनताई थोरात म्हणाल्या की, अमृतेश्वर मंदिरातील या सप्ताहाला मोठी समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,ह.भ.प.गावडे महाराज व कलामाई यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह मागील 41 वर्षापासून सुरू आहे.ज्ञानेश्वरी गाथा पारायण यावर्षी 400 महिलांचा सहभाग असून ज्ञानेश्वरी पारायण हा जीवनातील अमृत अनुभव आहे. प्रत्येकाने एक तरी ओवी अनुभवावी असे सांगताना वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्य दैवत म्हणून विविध जाती धर्मातील सर्व संतांनी समतेचा बंधुतेचा व प्रेमाचा संदेश दिला आहे. द्वेषला कुठेही थारा नाही. हा समतेचा बंधू भावाचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. महाकवी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत आपल्याला दिली विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी विचार आपल्याला दिले.सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, ज्ञानेश्वरी हे महाकाव्य मानवतेच्या कल्याणासाठी आहे. थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. मंजुळाताई थोरात या आमच्या आजी यांनी आम्हा सर्वांना पूजेपासून सर्व गोष्टी शिकविल्या वहिनी सौ.कांचनताई थोरात या अत्यंत धार्मिक व मनमिळावू आहेत. त्या कधीही पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. दररोज एक तरी ज्ञानेश्वरी ची ओवी वाचतात.तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असून महिलांची मोठी उपस्थिती आणि ज्ञानेश्वरी पारायण हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य राहिले आहे. दीपोत्सव हा आनंदाचा क्षण असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी अमृतनगर, घुलेवाडी सह संगमनेर मधील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ह.भ.प गोविंद महाराज करंजकर, व ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!