ब्रेकिंग

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोपरगावात कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोपरगावात कॅमेरा पूजन

जाहिरात मो-7756045359
जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोपरगावात कॅमेरा पूजन

कोपरगाव । प्रतिनिधी । जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोपरगाव तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कॅमेरा पूजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छायाचित्रण क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ छायाचित्रकार हेमचंद्र भवर, एस. पी. कुलकर्णी व ज्येष्ठ पत्रकार युसूफ रंगरेज यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांनी छायाचित्रकारांच्या कलेचे व पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. एखाद्या घटनेचे शब्दांत वर्णन करण्यापेक्षा त्या घटनेचा योग्य क्षण कॅमेऱ्यात टिपलेले छायाचित्र समाजमनावर अधिक प्रभावी ठसा उमटवते. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात छायाचित्रकारांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ छायाचित्रकारांनी या क्षेत्रात दिलेले योगदान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या अनुभवाचा सन्मान करण्याबरोबरच नव्या पिढीतील छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.तर याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार विजय कापसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित छायाचित्रकारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी ‘कालची, आजची व उद्याची फोटोग्राफी’ या विषयावर मार्गदर्शन करत काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल फोटोग्राफी, डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी उत्तम छायाचित्रासाठी निरीक्षणशक्ती, संयम आणि योग्य क्षण टिपण्याची कला महत्त्वाची असल्याचे सांगितले तर एस. पी. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार तथा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष युसूफ रंगरेज आणि राज्य पत्रकार संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष विजय कापसे यांनी सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अरुण कदम, उपाध्यक्ष महेश नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी तथा साईप्रिया स्टोअरचे संचालक प्रवीण आभाळे, राहुल आभाळे, योगेश पाठक, महेश गायकवाड यांच्यासह तालुक्यातील फोटोग्राफर एकता ग्रुपचे सदस्य, पत्रकार व छायाचित्रण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!