ब्रेकिंग

राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

जाहिरात मो-7756045359
राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाच्या संचालिका सौ शरयूताई देशमुख यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने देश व राज्य पातळीवर नावलौकिक मिळवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य जे बी सेठी यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने कायम गुणवत्ता जपली आहे. म्हणूनच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत कु. अथर्व संजय पाटील ( इ ८ वी), कु. अन्वी सिताराम कवडे ( इ 5 वी), चि. राजवीर धनंजय गोरे ( इ.  2 री ), कु. आरोही बाळासाहेब इरकर ( इ. 2 री), चि. प्रतीक विवेक कांडुरे (इ.2 री) यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच नांदेड येथे आयोजित ‘सप्तरंग कल्चरल फेस्टिवल’ या राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत म्युझिक ग्रुप प्रकारात अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या कु. सई मेहेत्रे, कु. आरोही लंके, कु. पूर्वी पल्लोड, कु. वेदिका सातपुते, कु. जान्हवी ठाकरे, कु. आर्या क्षीरसागर, कु. अश्विनी वर्पे, कु. सृष्टी सातपुते, कु. तन्वी सरोदे, कु. जिया शेख आणि कु. अनन्या मोरे यांनी आपल्या अप्रतिम सांघिक सादरीकरणातून प्रथम पारितोषिक पटकावले. तर ज्युनिअर गटातील वैयक्तिक गायन स्पर्धेत कु. सई मेहेत्रे हिने द्वितीय पारितोषिक मिळवले तसेच  सीनियर गटातील वैयक्तिक गायन स्पर्धेतही  कु. आरोही लंके – प्रथम पारितोषिक, कु. जिया शेख – द्वितीय पारितोषिक, कु. तन्वी सरोदे – तृतीय पारितोषिक अशी दैदिप्यमान कामगिरी करत विद्यार्थिनींनी यश मिळवले.तसेच नांदेड येथे आयोजित डान्स ग्रुप प्रकारात कु. साची डंग, कु. अनुमा साबळे, कु. सानवी चांगले, कु. सेजल सोनवणे, कु. आद्या साबळे, कु. आदिश्री मंडलिक, कु. वेदिका सातपुते, कु. पूर्वी पल्लोड, कु. जान्हवी ठाकरे, कु. आर्या क्षीरसागर, कु. अश्विनी वर्पे आणि कु. सृष्टी सातपुते यांनी आपल्या तालबद्ध, आकर्षक आणि दमदार सादरीकरणातून प्रथम पारितोषिक पटकावले. आणि सब-ज्युनिअर गटातील वैयक्तिक नृत्य प्रकारात कु. त्रिशा कदम हिने तृतीय पारितोषिक मिळवले. ज्युनिअर गटातील वैयक्तिक नृत्य प्रकारात कु. आदिश्री मंडलिक आणि कु. अनन्या मोरे यांनी तृतीय पारितोषिक, तर कु. श्राव्या पांडे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत आपल्या कलागुणांना राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले.  ड्युएट डान्स प्रकारात कु. राजवी मुरादे आणि कु. स्वरा पवार यांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर करत तृतीय पारितोषिक पटकावले.  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्राचार्य सौ.जे.बी.शेठी यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!