ब्रेकिंग

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात छात्रो की गुंज कार्यक्रमासाठी 2000 विद्यार्थीनी

खासदार राहुल गांधी यांच्या पुणे येथील कार्यक्रमासाठी संगमनेर मधून 2000 विद्यार्थिनी

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात छात्रो की गुंज कार्यक्रमासाठी 2000 विद्यार्थीनी

जाहिरात मो-7756045359
खासदार राहुल गांधी यांच्या पुणे येथील कार्यक्रमासाठी संगमनेर मधून 2000 विद्यार्थिनी
संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी हे पुणे येथे राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात 2000 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून या सर्व विद्यार्थिनी पुणे कडे रवाना झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,विद्यार्थी एकतेचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय, छात्रों की गुंज सरकार को सुननी पडेगी, जय हिंद जय महाराष्ट्र या घोषणांनी परिसर दुमदुमला.लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे देशभरातील युवकांशी छात्रों की गुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न त्यांच्या अडचणी समजून घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुढे मांडत आहे. या कार्यक्रमाची सत्ताधाऱ्यांनी मोठी धास्ती घेतली आहे.

यामुळे पुण्यामध्ये काल या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींवर लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध झाला. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला तर या विद्यार्थ्यांचा काय दोष म्हणून सरकारला सवाल विचारला याचबरोबर ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी समवेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार मोहन जोशी यांसह विविध काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.या विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठी हल्ल्याचा युवक काँग्रेस नेत्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही तीव्र शब्दात निषेध केला. विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज सरकारला ऐकावा लागेल.जखमी विद्यार्थ्याला धीर देत त्याला ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. राज्यभरातून पुणे येथील ए आय एस एस एम एस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायं पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून संगमनेर मधून शहर व तालुक्यातील 2000 विद्यार्थीनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत थेट राहुल गांधींशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थिनींना डॉ जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थिनींचा उत्साह घोषणाबाजी यामुळे संगमनेर चा आवाज पुणे येथील कार्यक्रमात घुमणार आहे.

 

विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे का ? समजून घ्या, आवाज दडपवू नका – डॉ.जयश्रीताई थोरात

शिष्यवृत्ती चा प्रश्न मांडणाऱ्या पुणे येथील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला असून हा  अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे का ? समजून घ्या. त्यांचा आवाज दडपऊ नका. ही झेन झी आहे त्यांना समजावून घ्यावा लागेल. खासदार राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज कार्यक्रमाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यामुळे विरोधक या कार्यक्रमाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि आत्मविश्वास यामुळे पुणे येथील हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करताना सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्या असे आवाहन युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!