ब्रेकिंग

कोपरगावातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका

 कोपरगावातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका

जाहिरात मो-7756045359

दरेवाडी, अहिल्यानगर येथून दोन आरोपी ताब्यात

अहिल्यानगर । प्रतिनिधी । कोपरगाव येथून पळवून नेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथील दरेवाडी परिसरातून सुखरूप सुटका केली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. १८ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील एका १२ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची तक्रार तिचे वडील निलेश भारत चावरे यांनी दिली होती. त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मुलगी हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड परिसरात असल्याचे समोर आले.

पथकाने कारवाई करून मुलीची सुटका केली तसेच नूर राजू पठाण (वय १९, रा. आंबेडकरनगर, राहाता) याला ताब्यात घेतले. चौकशीत कोपरगावहून अहिल्यानगर येथे येण्यासाठी समीर मनोज सोनगत (वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी) याने मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना अल्पवयीन मुलीसह पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!