धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान!

धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान!


धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त
राहाता । प्रतिनिधी । राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्गुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. धार्मिक आणि सामाजिक परंपरा मध्ये योगदान देण्याची विखे पाटील परिवाराची सक्रीयता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

धनगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा मोठा सोहळा आहे. सप्ताहाच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या साखरेची गरज लक्षात घेऊन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या सप्ताहामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.विखे पाटील परिवाराने जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह वारकरी सांप्रदाया मध्ये नेहमीच योगदान आणि सहकार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. धनगरवाडीतील या भक्तिमय सोहळ्यालाही कारखान्याच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य करण्यात आले.यावेळी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सोपानराव शिरसाठ, एम.डी. महेश कोनापुरे, संचालक लाटे पाटील, ताटे पाटील, यादव पाटील यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

धार्मिक परंपरा जपत समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचे काम विखे पाटील परिवार सातत्याने करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धनगरवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताह कमिटीकडे करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
धनगरवाडी येथे सप्ताह घेण्याचा निर्णय झाल्यानंतर या गावाला जोडणार्या सर्व रस्त्यांच्या कामासाठी जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून रस्त्यांची काम मार्गी लावली.यामुळे येणार्या लाखो भाविकांना येणे सोयीस्कर झाले.याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी मंत्री विखे पाटील यांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानले.



