ब्रेकिंग

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा आढावा; आमदार सत्यजीत तांबे यांचा विविध प्रश्नांवर संवाद

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा आढावा; आमदार सत्यजीत तांबे यांचा विविध प्रश्नांवर संवाद

जाहिरात मो-7756045359
श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा आढावा; आमदार सत्यजीत तांबे यांचा विविध प्रश्नांवर संवाद

श्रीरामपूर । प्रतिनिधी । श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रातील नागरिक, संस्थाचालक, शिक्षक, व्यावसायिक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत तालुक्यातील विविध प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांची माहिती घेतली.दौऱ्यात विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या गरजा, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना नवे ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्यांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या गरजेवरही यावेळी चर्चा झाली.

यासोबतच स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत बाजारपेठेची परिस्थिती, व्यवसायातील अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेऊन ते योग्य व्यासपीठावर मांडणे आणि आवश्यक त्या बाबींसाठी पाठपुरावा करणे, हा दौऱ्याचा महत्त्वाचा उद्देश राहिला.श्रीरामपूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांचीही आमदार तांबे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि आवश्यक विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नागरिक, संस्था आणि विविध क्षेत्रातील घटकांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!