ब्रेकिंग

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका

राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका

जाहिरात मो-7756045359

राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी

राहाता । प्रतिनिधी । महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत कठोरपणे सामोरे जाऊ, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राहाता नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, नगर परिषदेमधील महिला अधिकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील भगिनींनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी महिलांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात ‘आपण हक्काने दादांकडे जाऊ शकतो’ हा विश्वास निर्माण होणे, हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे,असे ते म्हणाले.

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.दरम्यान, अतिक्रमण हटविणे अथवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत काहींकडून टीका करण्यात आली. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधली. यावेळी महिलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यामुळे राहाता नगर परिषदेत पार पडलेल्या या सोहळ्याला भाऊ-बहिणीच्या नात्याचा जिव्हाळा लाभला. महिलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सन्मानासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!