संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नविन वास्तूमध्ये उत्साहात संपन्न
३ कोटी ४१ लाखांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर

संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नविन वास्तूमध्ये उत्साहात संपन्न


३ कोटी ४१ लाखांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर
संगमनेर । प्रतिनिधी । नाशिक विभाग कार्यक्षेत्र असलेल्या व संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असलेल्या संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या भव्य वास्तूमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ४१ लाख रुपयांचा नफा मिळविला असून, संस्थेच्या या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीबद्दल सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तबद्ध सहकार विचारांचा वारसा आणि लोकनेते मा. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनातून संस्थापक मा. डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व मा. आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संग्राम पतसंस्थेने सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. संस्थेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असून, संस्थेकडे १५६ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ८८ लाख रुपये, कर्जवाटप १३२ कोटी ९९ लाख रुपये, तर गुंतवणूक ५५ कोटी ४७ लाख रुपये आहे. तसेच संस्थेकडे ११ कोटी २० लाख रुपयांचा राखीव निधी व २९ कोटी ८६ लाख रुपयांचा स्वनिधी असून, स्थापनेपासून संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त आहे. नवीन वास्तूसह आधुनिक सुविधांचा संकल्प यावेळी संस्थापक मा. डॉ. सुधीर तांबे यांनी संस्थेच्या नवीन वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे सांगून सभासदांना आधुनिक व तत्पर सेवा देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. चांगल्या कर्जदारांना योग्य कर्जपुरवठा करण्याबरोबरच छोट्या कर्जदारांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यावर संस्थेने भर द्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, अमृतवाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. सुधाकर जोशी व संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सी.ए. बापुसाहेब टाक यांनी संस्थेच्या प्रगतीचे व पारदर्शक कारभाराचे कौतुक केले.सभेच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा दिला. व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन व अहवाल वाचन श्री. उमेश शिंदे यांनी केले. यावेळी चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा, व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी, डॉ. एन.एस. शेख, श्री. विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, श्री. सूर्यकांत शिंदे, श्री. नानासाहेब वर्पे, श्री. दत्तात्रय आरोटे, ॲड. प्रशांत गुंजाळ, श्री. सूचित गांधी, श्री. सुदीप वाकळे, श्री. उमेश बोटकर, श्री. श्रीकांत कोकणे, श्री. सोमेश्वर दिवटे, सौ. सुलभाताई दिघे, सौ. सुनंदाताई दिघे, श्री. अनिल सातपुते, सी.ए. अमित कलंत्री, व्यवस्थापकीय सल्लागार श्री. प्रकाश गुंजाळ तसेच संचालक मंडळाचे सदस्य, सभासद, मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्त यांच्या बळावर संग्राम पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



