वृक्षांना राखी बांधत मालदाड गावात अनोखे रक्षाबंधन साजरे

वृक्षांना राखी बांधत मालदाड गावात अनोखे रक्षाबंधन साजरे

वृक्षांना राखी बांधत मालदाड गावात अनोखे रक्षाबंधन साजरे
संगमनेर । प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरदऱ्या व निसर्गाने नटलेल्या मालदड गावात यावर्षी महिलांनी झाडांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक असे रक्षाबंधन साजरे केले आहे.मालदाड येथील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज देवस्थान इनाम परिसरात झाडांना राखी बांधून महिलांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे. यावेळी सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले, सौ. लता प्रकाश सोनवणे, सौ. अलका अंताराम पराड, सौ. अप्सरा पांडुरंग गिरी सौ. अनिता गोरक्षनाथ नवले, सौ. स्वाती नवनाथ नवले,सौ.अर्चना एकनाथ नवले, सौ . मंगल गोपिनाथ गफले, सौ. सुनिता भाऊसाहेब नवले, सौ. शारदा संजय शेलार, सौ. संगिता नवनाथ नवले, सौ. येलूबाई सुखदेव नवले, सतिष भाऊसाहेब नवले, हरि रामनाथ वामन, रमेश बाबुराव नवले, शिवाजी गबाजी नवले,कु. अक्षय भिमराज नवले, कु. पियुष गोरक्षनाथ नवले,कु . गौरंग गोरक्षनाथ नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्षाबंधन म्हणजे प्रेम ,आपुलकी आणि रक्षणाच्या भावनेचे प्रतीक असा सण आहे. याच भावनेला निसर्ग संवर्धनाची जोड देत यावर्षीचा रक्षाबंधनाचा सण महिलांनी निसर्गाच्या सानिध्यात साजरा केला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मालदड गावात विविध विकासकामे झाली असून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ही करण्यात आली आहे. त्यामुळे मालदड गाव आज हिरवाईने नटलेली आहे.वृक्ष हे आपले खऱ्या अर्थाने निस्वार्थी मित्र आहे. ते आपल्याला सावली, फळे ,फुले व जीवनावश्यक ऑक्सिजन देतात. वसुंधरेचे संवर्धन व संरक्षण करणे ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी असून त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. वृक्षांप्रती कृतज्ञेची भावना म्हणून आज महिलांनी झाडांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले आहे. पर्यावरण पूरक असा हा उपक्रम असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाचे लोकनेते बाळासाहेब थोरात , माजी आ. डॉ. सुधीर तांबे , सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे , डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अभिनंदन केले आहे



