ब्रेकिंग

गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

जाहिरात मो-7756045359

इंटर हाऊस हॉकी सामन्यांनी रंगला राष्ट्रीय क्रीडा दिन

कोपरगांव । प्रतिनिधी । हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडा उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येवून यावेळी विद्यार्थ्यांनी इंटर हाऊस हॉकी सामन्यांसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकरावजी काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निग कौन्सिल सदस्य व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी गव्हर्निग कौन्सिल सदस्य भास्करराव आवारे,बाबासाहेब कोते,ज्ञानदेव मांजरे, दिलीपराव चांदगुडे,किसनराव पाडेकर,राधुजी कोळपे,सुनीलजी बोरा,मधुकर बडवर,इन्स्पेक्टर नारायण बारे आदी मान्यवर उपस्थित होते.

गौतम पब्लिक स्कूलची हॉकी क्षेत्रातील यशस्वी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. तालुका, जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांमध्ये शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती रुजावी, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने सातत्याने विविध क्रीडा उपक्रम राबविले जातात.शाळेच्या या क्रीडा परंपरेला कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे तसेच सचिव सौ.चैतालीताई काळे यांचे सातत्याने मार्गदर्शन व भक्कम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होत असून शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद व महेश गोंडे यांच्या नियोजनातून इंटर हाऊस हॉकीच्या मैत्रीपूर्ण सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ऑरेंज, ब्ल्यू, ग्रीन आणि यलो हाऊसच्या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे हॉकीच्या मैदानावर चुरस आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.हॉकी सामन्यांचे उद्घाटन मीरा-भाईंदर नवघर डिव्हिजनचे एसीपी सोहेल शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य, शिस्त, संघभावना आणि मेहनत या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या क्रीडागुणांचे दर्शन घडविले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच चारही हाऊसच्या हाऊस मास्टर्स यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य नूर शेख यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!