ब्रेकिंग

पतीने पत्नीला तर आईने मुलासाठी दिली किडनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पतीने पत्नीला तर आईने मुलासाठी दिली किडनी
प्रवरा ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

जाहिरात मो-7756045359

पतीने पत्नीला तर आईने मुलासाठी दिली किडनी
प्रवरा ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

लोणी । प्रतिनिधी । डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी (ता. राहाता) येथे एकाच दिवशी दोन किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. पतीने आपल्या पत्नीला तर आईने मुलाला किडणी दीली या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये कौटुंबिक प्रेम, त्याग आणि माणुसकीचे दर्शन घडले. पहिल्या प्रकरणात सुनिता प्रवीण साबळे (वय ३३ वर्षे)रा. घारगाव, अकलापूर, ता. संगमनेर या किडनी प्राप्तकर्ता असून त्यांचे पती प्रवीण सुकदेव साबळे (वय ४२ वर्षे) यांनी पत्नीचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःची एक किडनी दान केली. पत्नीच्या जीवनासाठी पतीने घेतलेल्या या निर्णयातून पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि त्यागाची भावना अधोरेखित झाली. नगर जिल्ह्यात अशा प्रकारची ही अत्यंत दुर्मिळ आणि कौतुकास्पद किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे.


दुसऱ्या प्रकरणात अनिकेत बन्सी गुंजाळ (वय २२ वर्षे) हे किडनी प्राप्तकर्ता असून त्यांची आई हीरा बन्सी गुंजाळ (वय ५५ वर्षे), रा. बेल्ही, पुणे, यांनी आपल्या मुलाला जीवनदान देण्यासाठी स्वतःची एक किडनी दान केली. आई मुलाच्या नात्यातील ममत्व, त्याग आणि प्रेमाची ही प्रेरणादायी घटना ठरली आहे.
दोन्ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडल्या. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना नवजीवन मिळाले असून, आपल्या माणसासाठी अवयवदान म्हणजे जीवनदान हा संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्नीला किडणी दान करणारे प्रवीण सुकदेव साबळे तसेच मुलाला किडणी दान करणारी आई हीरा बन्सी गुंजाळ यांचे अवयवदानाबद्दल विशेष कौतुक केले आहे.या दोन्ही कुटुंबीयांच्या धाडसी निर्णयाचे आणि अवयवदानाच्या भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जिवंतपणी किडनीदान करून आपल्या कुटुंबातील सदस्याला नवजीवन देणाऱ्या पती आणि आईचा त्याग समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये रुग्णालय प्रशासनाचे अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, रूग्णालय प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. एन. एस.पवार, डॉ. जोर्वेकर, डॉ. तुषार भवर डॉ. एस. एल. तुंगीकर यांचा सहभाग होता. अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. विपिन विभूते यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. राहुल तांबे, डॉ. ऋषिकेश वाघोलीकर, डॉ. मयुर गंगवाल, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. काजल दरंदले, डॉ. संजय चौधरी, डॉ. अमोल भालेराव, डॉ. सुरजकुमार बांगर, डॉ. भाग्यश्री पुराणीक यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी रूग्णाचे नातेवाईक, प्रशासन, संपूर्ण डॉक्टर्सच्या टीमच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!