ब्रेकिंग

धोंडेवाडीत भक्तीचा जागर; अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून प्रारंभ 

धोंडेवाडीत भक्तीचा जागर; अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून प्रारंभ 

जाहिरात मो-7756045359
धोंडेवाडीत भक्तीचा जागर; अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून प्रारंभ 

कोपरगांव । प्रतिनिधी । धोंडेवाडी, ता. कोपरगाव येथे हनुमान मंदिर, श्री क्षेत्र धोंडेवाडी येथे आजपासून मंगळवार, दि. १ सप्टेंबर ते मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामुळे संपूर्ण धोंडेवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.

सप्ताहामध्ये दररोज पहाटे ४.३० ते ६ वाजता काकड आरती, सकाळी ७.३० ते १० ज्ञानेश्वरी पारायण, तसेच सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व रात्री ७ ते ९ कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहातील प्रमुख कीर्तनसेवेसाठी ह.भ.प. सागर महाराज घुमरे (सांगवी), ह.भ.प. कौशिक महाराज जाधव, भागवताचार्य माधवजी महाराज पैठणकर, श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस, ह.भ.प. राहुल महाराज डुमरे, ह.भ.प. अरुण महाराज दिघे तळेगावकर, ह.भ.प. अभिजीत महाराज गिरी आणि ह.भ.प. उद्धव महाराज पवार यांची  कीर्तनसेवा लाभणार आहे.

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, हरिपाठ, पारायण व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी यांनी केले आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने धोंडेवाडीमध्ये भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचा जागर होणार असून, संपूर्ण परिसर ‘हरिनामाच्या गजराने’ दुमदुमणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!