ब्रेकिंग

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा उद्या शुभारंभ; १७ कोटींच्या निधीतून होणार कायापालट!

माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; आमदार आशुतोषदादा काळे यांची प्रमुख उपस्थिती

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा उद्या शुभारंभ; १७ कोटींच्या निधीतून होणार कायापालट!

माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; आमदार आशुतोषदादा काळे यांची प्रमुख उपस्थिती

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या राज्य मार्ग क्रमांक ६५ रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा उद्या, गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

रस्ते विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे हे काम परिसरासाठी महत्त्वाचे ठरणार असून, या भूमिपूजन सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, दळणवळण अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्यामुळे १७ कोटींच्या निधीतून होणाऱ्या या कामाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. माजी विधानसभा सदस्य तथा कोपरगाव मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. विधानसभा सदस्य तथा कोपरगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, वक्रतुंड मंगल कार्यालय, पोहेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!