साई नामाचा गजर थेट गोव्याच्या भूमीत; साईराम महाराज रहाणे यांची उद्या गोव्यात कीर्तनसेवा

साई नामाचा गजर थेट गोव्याच्या भूमीत; साईराम महाराज रहाणे यांची उद्या गोव्यात कीर्तनसेवा


साई नामाचा गजर थेट गोव्याच्या भूमीत; साईराम महाराज रहाणे यांची उद्या गोव्यात कीर्तनसेवा
कोपरगांव । प्रतिनिधी । जवळके येथील सुपुत्र तथा वारकरी संप्रदायाचे सेवेकरी ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची आज गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी गोवा येथे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. सिद्धी साई भक्त मंडळ, गोवा यांच्या वतीने पालये तुये पेडणे, गोवा येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात राहून वारकरी संप्रदायाची पताका उंचावत अध्यात्म, भक्ती आणि प्रबोधनाची सेवा करणाऱ्या साईराम महाराज रहाणे यांना थेट गोव्याच्या भूमीत कीर्तनसेवेची संधी मिळाल्याने जवळकेसह परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कीर्तन सेवेसाठी रवाना होण्यापूर्वी आज सकाळी महाराज व त्यांच्या टीमने शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण टीम गोव्याच्या दिशेने रवाना झाली. गोव्याच्या भूमीत साई नामाचा गजर, भक्तीचा सागर आणि संतविचारांचा जागर घडणार असून, या कीर्तन सेवेकडे गोव्यातील भाविकांसह जवळके परिसरातील नागरिकांचेही लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील एका वारकरी सेवेकऱ्याची कीर्तनसेवा थेट गोव्यापर्यंत पोहोचल्याने जवळकेच्या आध्यात्मिक परंपरेला एक नवा मान मिळाला आहे.



