ब्रेकिंग
गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदी तातडीने पाणी सोडा – आमदार सत्यजित तांबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदी तातडीने पाणी सोडा – आमदार सत्यजित तांबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदी तातडीने पाणी सोडा – आमदार सत्यजित तांबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
संगमनेर । प्रतिनिधी । सध्या गणेश उत्सवाचे वातावरण असून राज्यासह देशात श्री गणेशाचे स्वागत भक्तिमय व आनंदमय वातावरणात होणार आहे. संगमनेर शहरातही हा गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असून गणेश मूर्ती विधिवत विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात आवश्यक पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेश मूर्तींची विधिवत विसर्जन करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा गणेश मूर्तींची हेळसांड होते. गणेश उत्सव हा नागरिकांच्या धार्मिक व भावनिक सध्याची जोडला गेलेला मोठा उत्सव असून गणेश मूर्तींची विधिवत विसर्जन हा या उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जन करीत असताना नदीपात्रात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रवारा नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याने संगमनेर शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन लांबणीवर पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सन 2012 मध्ये तर पाणी नसल्यामुळे गणेश विसर्जन तब्बल 15 दिवस पुढे ढकलण्यात आले होते. यावर्षीही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि गणेश विसर्जनाच्या दिवशीच संगमनेर शहर व तालुक्यातील गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करता यावे यासाठी प्रवरा नदी पात्रात पाणी असणे गरजेचे आहे. तरी गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध राहील यासाठी प्रवरा नदीचे आवश्यक आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी ही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे



