ब्रेकिंग

जिल्हा बँकेच्या रणांगणात रणजितसिंह देशमुख; राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देत उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या रणांगणात रणजितसिंह देशमुख; राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देत उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या रणांगणात रणजितसिंह देशमुख; राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देत उमेदवारी अर्ज दाखल

संगमनेर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी – संगमनेर मतदारसंघातून श्री. रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रणजितसिंह देशमुख यांनी संगमनेर तालुका सहकारी दूध संघ (राजहंस)च्या चेअरमनपदाचा रीतसर राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते आता थेट मैदानात उतरले असून त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्राशी असलेला त्यांचा दीर्घकाळचा संबंध आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलेले काम यामुळे त्यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघातील लढतीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने देशमुख यांच्या उमेदवारीमागील राजकीय व सहकार क्षेत्रातील समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.संगमनेर मतदारसंघातून देशमुख यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात निवडणुकीतील प्रचाराची दिशा आणि स्थानिक सहकारातील समीकरणे स्पष्ट होणार आहेत.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सहकारी संस्थांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आपली भूमिका राहणार असल्याचे देशमुख यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघातील ही निवडणूक आगामी काळात चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!