ब्रेकिंग

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांच्या “उलगुलान” मोर्चाला दिला पाठिंबा

आदिवासी विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्या -डॉ जयश्रीताई थोरात

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांच्या “उलगुलान” मोर्चाला दिला पाठिंबा

जाहिरात -7756405359
आदिवासी विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्या -डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । आपल्या विविध मागण्यांसाठी 40 दिवसांहून अधिक काळ आंदोलन करूनही अपेक्षित दखल न घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर पासून मुंबईच्या दिशेने उलगुलान हा मोर्चा सुरू केला आहे .सरकारने या विद्यार्थ्यांची दखल न घेता दडपशाही करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध करत या आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मंजूर करा अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली असून त्यांनी मुंबईमध्ये या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.मुंबई येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अत्यंत आस्तेवाईकपणे चौकशी करत या विद्यार्थ्यांना डॉ जयश्रीताई थोरात यांनी पाठिंबा दिला. याचबरोबर सरकारने विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या दडपशाहीच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आदिवासी विभागाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 40 दिवसांपेक्षा अधिक काळ या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले म्हणून आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी 170 किलोमीटरची पायपीट करून मुंबईमध्ये पोहोचले. तरीही त्यांची कोणतीही दखल घेतली नाहीm उलट ते रात्री काँग्रेस कार्यालयात झोपले असताना मध्यरात्री त्यांना दडपशाही करून अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे अत्यंत निंदनीय आहे.आदिवासी आश्रम शाळा व वस्तीगृहांमधील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुरा सुविधा, भोजन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा  या आंदोलनाचा उद्देश आहे. काही दिवसापूर्वी सर्पदंशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 3 मुली मृत्युमुखी पडल्या. मात्र सरकारने फक्त घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात कृती केली नाही .यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरू केले.लोकशाहीमध्ये न्याय मार्गाने आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये संविधानाच्या मूल्यावर विश्वास सरकारचा आहे की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ते दडपशाही करत आहेत. विद्यार्थ्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारात जर असे वागत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल करताना गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही .त्यामुळे सरकारने तातडीने विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांच्या सर्व प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पहावे अशी मागणी युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे

 

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला

नाशिक जिल्ह्यातून मुंबईकडे जात असलेल्या युवकांना काँग्रेस कार्यालयामधून अटक करण्याचा प्रयत्न झाला .त्याचबरोबर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा निषेध करून महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा सरकारच्या धोरणांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन केले. यानंतर राज्यभरात माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर डॉ जयश्रीताई थोरात यांनी तात्काळ मुंबई येथे जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली. आपण विद्यार्थ्यांसमवेत आहोत असा विश्वास दिला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!