ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात


एमपीएससीच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा
संगमनेर (प्रतिनिधी)- देशामध्ये आणि राज्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तरुणाईमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तरे देऊ शकत नाही. निवडणूक आयोग हा भाजपचे बाहुले झाला असून ज्ञानेश कुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे .तर राज्य सरकार दुष्काळी पंचनामेंसाठी दोन साक्षीदार मागत आहे हा अत्यंत हास्यास्पद प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांवर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आता सरकारने पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मोठी मदत केली पाहिजे.आपणही राज्यात कृषी व महसूल मंत्री म्हणून काम केले असून त्यावेळेस शेतकऱ्यांना विनाअट मदत मिळत होती. आता दुष्काळी पंचनामे करण्यासाठी दोन शेजारच्या साक्षीदारांची आवश्यकता असल्याचे सरकारने म्हटले आहे. हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे .पाऊस नाही. पिके जळून गेली आहे. समोर दिसते आहे. शेजारच्यांना विचारायची गरज काय असा सवाल करताना शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार सरकारचा असल्याची टीका त्यांनी केली.त्याचबरोबर ज्ञानेश कुमार यांचा वापर हा लोकशाहीचा घात करण्यासाठी भाजपकडून केला जात आहे. ते भाजपची निवडणूक जिंकण्याचे हत्यार बनले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देणे ही निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र भाजपचे लोक त्याचे उत्तर देत आहेत. भाजप त्यांचे का समर्थन करत आहे हा मोठा प्रश्न असून एसआयआर च्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये भाजपने सुद्धा सहभागी झालं पाहिजे होते . मात्र ते निवडणूक आयोगाचे समर्थन करत आहे. निवडणूक आयोगाचा वापर करत आहे.
भाजपचा हेतू सुद्धा नाही.निवडणुकीमध्ये वेगवेगळे फंडे वापरून सत्तेमध्ये राहायचे ही भाजपची पद्धत आहे.



