बहादरपूरच्या कन्यांनी गाजवले क्रीडा मैदान; तनुजा प्रथम तर गौरी तृतीय!

बहादरपूरच्या कन्यांनी गाजवले क्रीडा मैदान; तनुजा प्रथम तर गौरी तृतीय!


बहादरपूरच्या कन्यांनी गाजवले क्रीडा मैदान; तनुजा प्रथम तर गौरी तृतीय!
कोपरगांव । प्रतिनिधी । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहादरपूर येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु. तनुजा राहणे हिने उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले. त्याचबरोबर कु. गौरी साईनाथ राहणे हिने लांब उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही तनुजा आणि गौरी यांनी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तालुकास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे एकाच शाळेतील या दोन्ही विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश हे बहादरपूर गावासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.तनुजा राहणे हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यशाची नोंद केली. गौरी साईनाथ राहणे हिनेही लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावत बहादरपूरच्या शाळेच्या क्रीडा यशात भर घातली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात मोठी गुणवत्ता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन, सरावासाठी सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे राहणे भगिनींच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर येथील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी तनुजा आणि गौरी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, भविष्यात त्यांनी आणखी मोठी भरारी घेत शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



