ब्रेकिंग

बहादरपूरच्या लेकीची गुणवत्तेची भरारी; सिद्धी पाडेकरची जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पात्रता!

बहादरपूरच्या लेकीची गुणवत्तेची भरारी; सिद्धी पाडेकरची जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पात्रता!

जाहिरात -7756405359

इस्रोच्या डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा (केरळ) येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड चाचणीच्या पुढील टप्प्यात प्रवेश

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहादरपूर येथील गुणवंत विद्यार्थिनी कु. सिद्धी अशोक पाडेकर हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय निवड चाचणीत चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. या यशाच्या जोरावर तिची डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा, केरळ येथे आयोजित शैक्षणिक सहल २०२६-२७ साठीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पात्रता ठरली आहे. तिच्या या यशामुळे बहादरपूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेसह संपूर्ण गावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अंतराळ विज्ञानाची माहिती मिळावी, तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने अशा शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. या सहलीच्या निवड प्रक्रियेत तालुकास्तरावर चतुर्थ क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पात्र होणे ही सिद्धीसाठी अभिमानास्पद बाब आहे.

सिद्धीने मिळविलेले हे यश तिची मेहनत, जिद्द, अभ्यासातील सातत्य आणि गुणवत्तेचे प्रतीक मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक क्षेत्रात मोठी झेप घेण्याची क्षमता असून, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते निश्चितच यश संपादन करू शकतात, हे सिद्धीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.सिद्धीच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका, वर्गशिक्षक  तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले. गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनीही तिच्या यशाचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आता जिल्हास्तरीय निवड चाचणीतही सिद्धी उत्कृष्ट कामगिरी करेल आणि इस्रोच्या डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा, केरळ येथील शैक्षणिक सहलीची संधी मिळवेल, असा विश्वास शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे बहादरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सिद्धीच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!