ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आ.सत्यजित तांबे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आ.सत्यजित तांबे

जाहिरात -7756405359
तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम होणार
संगमनेर । प्रतिनिधी । भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. तालुक्यात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असून विविध गावांमधील रस्त्याचे मजबुतीकरण कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

देवकवठे ते बोटा असा 100 किलोमीटरचा विस्तीर्ण असणाऱ्या संगमनेर तालुक्यात पठार भाग, प्रवरा पट्टा व तळेगाव भाग असे भौगोलिक दृष्ट्या तीन विभाग येतात. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात 171 गावे व 258 वाडी वस्तीवर सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 3054 योजनेअंतर्गत आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी व इतर निधीमधून एक कोटी असे 3 कोटी रुपये रस्त्यांच्या मजबुती करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमधून चिखली ते जवळे कडलग रस्ता इजीमा 33 मजबुतीकरण करणे कामासाठी 40 लाख रुपये, जवळे बाळेश्वर रस्ता, सारोळे पठार फाटा ते सारोळे पठार गाव इजीमा 37 रास्ता मजबुतीकरण कामासाठी 20 लाख रुपये, शेंडेवाडी, सतीचीवाडी डोळसणे रस्ता मजबुतीकरण कामासाठी 20 लाख रुपये, शेडगाव, मालूंजे,रणखांब, कवठे मलकापूर, वरवंडी फाटा ते खांबे रस्ता मजबुतीकरण कामासाठी 20 लाख रुपये असे 1 कोटी रुपयेतर जिल्हा नियोजन समितीच्या 3050 अंतर्गत खांबा ते खरशिंदे रस्ता मजबुतीकरण कामासाठी 10 लाख रुपये, कवठे मलकापूर काळे वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 10 लाख रुपये डिग्रस ते हजारवाडी रस्ता मजबुतीकरण करणे 10 लाख रुपये, पिंपळगाव कोझिरा ते चोथेमळा रस्ता मजबुतीकरण कामासाठी 10 लाख रुपये, वडगाव लांडगा येथील जवळे कडलग, वडगाव लांडगा ते नंदनखिंड रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये, कृषी उत्पन्न बाजार समिती वडगावपान पोखरी हवेली रस्ता सुधारणे कामासाठी 15 लाख रुपये, साकुर जोगे पठार रस्ता मजबुतीकरण कामासाठी 15 लाख रुपये, कुंभारवाडी ते ठाकरवाडी रस्ता मजबुतीकरण कामासाठी 15 लाख रुपये, वरझडी बुद्रुक ते बोडखेवाडी रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये, नांदुरी दुमाला ते पतीगे बाबा रस्ता मजबुतीकरण कामासाठी 15 लाख रुपये, खांडगाव ते गणेशवाडी,गोडसेवाडी रस्ता मजबुतीकरण कामासाठी 20 लाख रुपये, मांडवे बुद्रुक हवालदार वस्ती ते जोगे पठार घाट रस्ता मजबूती करण्यासाठी 20 लाख रुपये, धांदरफळ खुर्द येथील धांदरफळ खुर्द माणकेश्वर मळा ते गोडसेवाडी रस्ता मजबूती करण्यासाठी 20 लाख रुपये असे दोन कोटी रुपये अशा एकूण तीन कोटी रुपयांच्या निधीमधून या रस्त्यांचे मजबुतीकरण होणार आहे.या रस्त्यांच्या मजबुतीकरण कामामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. गावोगावच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे वरील विविध गावांमधील नागरिक युवक व महिलांनी अभिनंदन केले आहे.

रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार – आमदार तांबे

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. ग्रामीण विकास, शेती, सहकार,शिक्षण,व्यापार अशा सर्व गोष्टींमध्ये संगमनेर तालुका हा राज्यात प्रगतशील असून ग्रामीण भागातील विविध रस्त्यांकरता मिळालेल्या या निधीमधून या रस्त्यांचे मजबुतीकरण होणार असल्याने नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. याचबरोबर इतरही तालुक्यांमध्ये शिक्षणाबरोबर विविध विकास कामांसाठी निधी मिळवला असून हे सर्व कामे गुणवत्तापूर्ण होऊन नागरिकांना चांगली सुविधा मिळेल.

आमदार सत्यजित तांबे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!