ब्रेकिंग
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला डॉ.जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा ; दोषींना राजीनामा द्यावाच लागेल
समाजातील आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचा आहे – डॉ. जयश्रीताई थोरात

पुणे / संगमनेर । प्रतिनिधी । पुण्यात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देत, “तुम्ही देत असलेला लढा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा, महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद तुमच्यातच आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकरणात दोषींवर जबाबदारी निश्चित करून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका मांडताना समाजातील व आयोगामधील ब्लड कॅन्सर ठीक करायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुणे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आता चळवळ बनले असून, गेल्या नऊ दिवसांपासून विश्वजित कदम, रोहित पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अनेक जण विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील आहेत. या आंदोलनाला डॉ.जयश्रीताई थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी संगमनेर मधील 50 युवक कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाले की, आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले, तरी घाबरू नका; ते आपल्यासाठी मेडल आहे असे समजा. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक करताना त्यांनी त्यांच्या संघर्षाला सलाम केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मुलींना अनेक सामाजिक आणि कौटुंबिक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीही त्या आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या आहेत. पालकांनी व समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना संघर्षाची प्रेरणा दिली. संत, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी एकजूट कायम ठेवून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.मा महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे डॉ.जयश्रीताई थोरात यांनी स्पष्ट केले. “आपल्याला समाजातला आणि आयोगातला ब्लड कॅन्सर बरा करायचा आहे,” असे स्पष्ट विधान करत त्यांनी परीक्षा व आयोगाच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी आमदार रोहित पवार, माजीमंत्री डॉ.विश्वजीत कदम, आमदार अंबादास दानवे, शिवराज मोरे, विवेकानंद पाटील, प्रियंका, डॉ.ओंकार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.