ब्रेकिंग

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

जाहिरात -7756405359

बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

संगमनेर । विनोद जवरे । संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून राज्य महामार्ग क्र. ७१ वरील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृतकाल रस्ते विकास आराखड्यांतर्गत एकत्रित तरतुदीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

संगमनेर बसस्थानक, पीडब्ल्यूडी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे दिल्ली नाकामार्गे प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा या प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या सुधारणेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना या निधी मंजुरीमुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या कामामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था तसेच विविध युटिलिटी लाईन्ससाठी आवश्यक कामांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याची क्षमता वाढण्यास, वाहतुकीचे नियोजन सुधारण्यास आणि शहरातील नागरी सुविधांना बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.संगमनेर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून मिळालेला हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!