हरवलेले १० तोळे सोने शोधून शिर्डी पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास; १५ लाखांचा मुद्देमाल सुरक्षित!
हरवलेले १० तोळे सोने शोधून शिर्डी पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास; १५ लाखांचा मुद्देमाल सुरक्षित!

हरवलेले १० तोळे सोने शोधून शिर्डी पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास; १५ लाखांचा मुद्देमाल सुरक्षित!
कोपरगाव । प्रतिनिधी । येवला येथील महिला जबीन साजित खान यांचे रिक्षामध्ये प्रवासादरम्यान गहाळ झालेले तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने शोधून काढण्यात येवला पोलिसांना यश आले आहे. सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून महिलेला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकला आहे.
पोलिसांची तत्परता; १५ लाखांचा मुद्देमाल सुरक्षित!
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचा माग काढत पोलिसांनी महिलेचे गहाळ झालेले १० तोळे सोन्याचे दागिने रिक्षाचालकाच्या घरातून हस्तगत केले. सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत, मंगेश भोसले व सुनील दिघे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला जबीन साजित खान यांची काळ्या रंगाची बॅग रिक्षामध्ये प्रवास करताना गहाळ झाली होती. या बॅगेमध्ये सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने असे साडेपाच तोळे सोने, तसेच हातातील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे कडे, असे एकूण १० तोळे सोन्याचे दागिने होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तातडीने तपासाच्या सूचना देऊन पोलीस पथक रवाना केले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत, मंगेश भोसले आणि सुनील दिघे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा माग काढण्यात आला. कौशल्यपूर्ण तपासाअंती महिलेचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने रिक्षाचालकाच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.अशा प्रकारे तब्बल १० तोळे सोने आणि सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुरक्षित मिळवून देत येवला पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचे नियोजन आणि पोलीस पथकाची तत्परता यामुळे ही यशस्वी कारवाई शक्य झाली. शिर्डी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



