ब्रेकिंग

 जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख; सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय!

 जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख; सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय!

सहकार विकास आघाडी, संगमनेरच्या वतीने नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे उत्साहात अभिनंदन!

अहिल्यानगर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानली जाते. अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी रणजितसिंह देशमुख यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करणे, शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देणे, सहकारी संस्थांना बळकटी देणे आणि बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणे, अशा अपेक्षा त्यांच्या निवडीमुळे व्यक्त होत आहेत.दरम्यान, सहकार विकास आघाडी, संगमनेर यांच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील सहकार क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळून सहकार क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.सहकार क्षेत्रातील नव्या जबाबदारीसाठी रणजितसिंह देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!