अखेर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील; राजकीय चर्चांना पूर्णविराम!
अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडी, चर्चांना आणि तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम

अखेर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील; राजकीय चर्चांना पूर्णविराम!

अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडी, चर्चांना आणि तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम
अहिल्यानगर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा बहुप्रतीक्षित फैसला अखेर झाला असून, अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात अध्यक्षपदाच्या निवडीवरून विविध नावांची चर्चा सुरू होती. नेमकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, राजकीय समीकरणे, पडद्यामागील हालचाली आणि वेगवेगळ्या नावांभोवती रंगणाऱ्या चर्चांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत उत्सुकता कायम होती.मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अंतिम मानला जात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांच्या निर्णयानुसार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.या निवडीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची मोठी जबाबदारी आता डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर असणार आहे.अध्यक्षपदाच्या या निवडीने अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, आगामी काळात जिल्हा बँकेच्या कारभाराला कोणती दिशा मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


