भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

मा. नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या इंदिरानगर येथील प्रभा निवासस्थानी भाऊबीज प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, आदींसह कुटुंबातील सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे औक्षण केले तर सौ कांचनताई थोरात यांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे औक्षण केले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी बंधू आमदार सत्यजित तांबे यांचे औक्षण केले.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वर्षभर प्रत्येकजण कष्ट करतो धावपळ करतो .मात्र दिवाळीचा हा कालखंड सर्वांच्या जीवनात आनंद देणार असतो. हा समानतेचा बंधू भावाचा मानवतेचा संदेश देणारा असा गोडीचा सण आहे. हा सण सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. भाऊबीज हा दीपावली मधील महत्त्वाचा उत्सव असून बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे. बहिण भावांमधील जिव्हाळा आपुलकी प्रेम यामधून अधिक दृढ होते.
यावर्षी अलनिनो च्या प्रभावामुळे अत्यंत कमी पाऊस झाला आहे दुष्काळाचे मोठे संकट आहे शेतकरी शेतमजूर अडचणीमध्ये आहे. शहरांमध्ये ही पाण्याची कमतरता भासणार आहे त्यामुळे पाणी प्रत्येकाला काटकसरीने वापरावे लागणार आहे. पुढील दहा महिने संकटाचे आहे. सरकारने अशा काळात शेतकऱ्यांना व शेतमजुरांना भरीव मदत केली पाहिजे. दीपावलीच्या काळामध्ये सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती मात्र दहा महिन्यांमध्ये पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीआमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दीपावली हा आनंदाचा कालखंड आहे. दर दीपावली लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी होते. थोरात साहेबांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. आपण सर्व त्या परिवारातील घटक असून जीवनाचा हा कालखंड आनंदी जावा यासाठी सर्वांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा विकसित आणि वैभवशाली ठरला आहे विविध सहकारी संस्थांचे सुमारे 160 कोटी रुपये बाजारपेठेत आल्याने संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. संगमनेरचा माणूस व्यापारी प्रामाणिक असल्याने आसपासच्या तालुक्यांमधील अनेक नागरिक खरेदीसाठी संगमनेर मध्ये येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आ.सत्यजित तांबे यांचे सह उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेही औक्षण केले.



