थोरात कारखाना 3200 रु. प्रति टन पहिली उचल देणार
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची पहिली उचल 3200 जाहीर

थोरात कारखाना 3200 रु. प्रति टन पहिली उचल देणार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची पहिली उचल 3200 जाहीर
संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद ,शेतकरी, ऊस उत्पादक यांचे हित जोपासले असून यावर्षी सन 2026-2027 या गळीत हंगामातील येणाऱ्या उसासाठी पहिली उचल प्रति टन 3200 रुपये जाहीर केले असल्याची माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे. शिस्त, काटकसर दूरदृष्टी व पारदर्शक काम यामुळे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकरी व ऊस उत्पादकांचा थोरात कारखान्यावर कायम मोठा विश्वास राहिला आहे.कारखान्याने सभासद ,शेतकरी ऊस उत्पादक यांच्या हिताला कायम प्राधान्य दिले आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना दिवाळीमध्ये कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति टन अनुदान दिले आहे. तर कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे याचबरोबर दीपावली मध्ये सुमारे 22 कोटी 11 लाख रुपये बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली होती.अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस कमी झाला आहे प्रतिकूल परिस्थिती असताना शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कारखान्याने पहिली उचल 3200 प्रति टन जाहीर केली आहे. यामुळे ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.कारखान्याने 3200 प्रति टन पहिली उचल जाहीर केल्याने शेतकरी व ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्वांनी कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.



