ब्रेकिंग

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे मैदानात; प्रभानिवासात नागरिकांची मोठी गर्दी, समस्यांच्या निवारणासाठी तातडीने पुढाकार!

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे मैदानात; प्रभानिवासात नागरिकांची मोठी गर्दी, समस्यांच्या निवारणासाठी तातडीने पुढाकार!

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे मैदानात; प्रभानिवासात नागरिकांची मोठी गर्दी, समस्यांच्या निवारणासाठी तातडीने पुढाकार!

संगमनेर | प्रतिनिधी | नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा एकदा थेट जनसंवादावर भर दिला आहे. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असून, आज संगमनेर येथील त्यांच्या प्रभानिवासात विविध भागांतील नागरिकांनी भेट देत आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी नागरिकांनी स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय कामे तसेच वैयक्तिक अडचणी आमदार तांबे यांच्यासमोर मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांनी संबंधित प्रश्नांची माहिती जाणून घेतली. काही प्रश्नांच्या बाबतीत संबंधित अधिकारी व शासकीय विभागांशी थेट चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, तर उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने देण्यापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याची भूमिका आमदार तांबे यांनी या भेटीगाठींतून अधोरेखित केली. नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सहज उपलब्ध असणे आणि त्या प्रश्नांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणे, या कार्यपद्धतीमुळे नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क अधिक दृढ होत आहे.

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य, त्यांच्या अडचणींच्या निवारणासाठी तत्परता आणि विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, अशा भूमिकेतून आमदार सत्यजीत तांबे यांचा जनसंवाद सुरू असल्याचे आजच्या भेटीगाठींतून स्पष्ट झाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!