ब्रेकिंग

अमृतवाहिनी सह.बँक शेतकरी व युवकांच्या मदतीसाठी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी सह.बँक शेतकरी व युवकांच्या मदतीसाठी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

साकुर फाटा येथे अमृतवाहिनी बँकेच्या 14 व्या शाखेचे उद्घाटन
 नाशिक ।  प्रतिनिधी ।  इगतपुरी आणि या परिसराशी आपला जुना ऋणानुबंध आहे. एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो नागरिकांची दररोज आरोग्य सेवा केली जात असून या विभागांमध्ये ते महत्त्वाचे केंद्र झाले आहे. साकुर परिसर हा नव्याने करेक्टिव्हिटी मध्ये मुख्य केंद्र बनणार असून अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी उद्योजक व युवकांना मदतच होईल असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

साकुर फाटा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 14 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार शिवराम झोले, नारायण शेठ वाजे, निवृत्ती जाधव, पांडुरंग घुले, चेअरमन सुधाकर जोशी व्हा.चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, उत्तमराव सहाने, के.के.थोरात, कचरू डुकरे,उत्तमराव झनकर, नंदू गाढवे, सुनील सहाने, बाळासाहेब कुकडे, मिलिंद कुकडे,आत्माराम फोकणे, रंगनाथ भगत,माणिकराव फोकणे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, दशरथ वर्पे, विष्णुपंत रहाटळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल हे या परिसराचे मुख्य आरोग्य केंद्र बनले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भातून अनेक नागरिक आरोग्य सेवेसाठी या ठिकाणी येत आहेत अत्यंत चांगली सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे. समृद्धी महामार्ग वाढवण बंदराचा महामार्ग यामुळे या विभागाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.अमृतवाहिनी बँक ही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर काम करत असून बँकेने सर्वसामान्य नागरिक,ठेवीदार,कर्जदार यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. चौदाव्या शाखेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी नागरिक नवउद्योजक यांना नक्कीच मदत होईल असा विश्वास व्यक्त करताना चांगला हेतू ठेवून काम केले तर यश नक्की मिळते असे ते म्हणाले या विभागाचे आता रूप बदलले प्रत्येकाने नव्या होणाऱ्या बदलांबरोबर आपली प्रगती करावी असे आवाहन केले.

तर खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वावरील संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून या विभागाची आरोग्याची काळजी घेण्याचे काम त्यांनी केले आहे. सध्या सहकार क्षेत्र अडचणीत आहे मात्र तरी चांगल्या नेतृत्वामुळे संगमनेरचे सहकार सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे. या विभागात बँकेचा नक्कीच उपयोग होईल असे ते म्हणाले.तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, या परिसराचा आणि संगमनेरचा जुना ऋणानुबंध आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा जपली जात आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेला महत्व दिले आहे. म्हणून हे लोकसेवेचे आरोग्य केंद्र ठरले आहे. खाजगी क्षेत्राकडून होणारी लूट थांबवण्यासाठी सहकार क्षेत्र काम करत असू या क्षेत्राला अधिक बळकटी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.तर सुधाकर जोशी यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती देताना डिजिटल प्रणाली, मोबाईल बँकिंग या अत्याधुनिक सुविधांसह अमृतवाहिनी बँकेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळवले असून सुमारे 1250 कोटींची उलाढाल असल्याचे सांगितले.यावेळी संचालक किसन सुपेकर, लक्ष्मण खेमनर,शिवाजी जगताप, किसनराव वाळके, अण्णासाहेब शिंदे,विवेक तांबे, राजू गुंजाळ, मोहन करंजकर यांच्यासह विविध संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर राजू गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी साकुर व परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!