जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मदत…
यशोधन कार्यालयाकडून संसार उपयोगी साहित्य व किराणा, भांडी यांची मदत

यशोधन कार्यालयाकडून संसार उपयोगी साहित्य व किराणा, भांडी यांची मदत
संगमनेर (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जांबूत येथील जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य, किराणा व घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली.जांबुत येथे वारे कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना किराणा भांडी व घरगुती साहित्य देण्यात आले यावेळी सभापती शंकर पा खेमनर, यशोधन कार्यालयाचे आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, जनसेवक अविनाश आव्हाड, सरपंच सोनाली शेटे, उपसरपंच सुभाष डोंगरे, विठ्ठलराव भागवत, पांडुरंग शेटे, रमेश शेटे, राजेंद्र घुले तर वारे कुटुंबीयांच्या सिंधुबाई वारे, ताई वारे ,देवराम मेंगाळ आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरिबांसाठी अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तालुक्यातील जनतेसाठी आमदार बाळासाहेब थोरात हे कायम आधारवड ठरले असून वारे कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचे गृह उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले यावेळी त्या घरामध्ये झोपलेली दोन बालके रवींद्र बर्डे या युवकाने प्रसंगावधान राखून या आगीतून बाहेर काढत या बालकांचा जीव वाचवला. घटनेचे वृत्त समजतात लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात ही मुंबईत असून सुद्धा तातडीने यशोधन कार्यालयास त्यांनी सूचना दिल्या व या कुटुंबीयांना मदतीसाठी किराणा व इतर साहित्य पाठवले. माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी या कुटुंबाला संसार उपयोगी भांडी यांची मदत केली.यावेळी बोलताना शंकर पाटील खेमनर म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी पठार भागावर कायम प्रेम केले आहे. वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मदतीसाठी ते धावले आहेत. झालेली घटनाही अत्यंत दुर्दैवी असून या गरीब माणसांच्या मदतीकरता यशोधनच्या वतीने मदत करण्यात आली असून शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले.तर आदिवासी सेवक प्रा बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गोरगरिबांची कायम सेवा केली त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आणि या तालुक्यातील सर्व जनता आमदार थोरात यांच्याच पाठीशी उभी आहे. मागील आठवड्यात झालेला निकाल अनपेक्षित होता मात्र जनता ही आमदार थोरात यांच्याच पाठीशी आहे आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात हेच सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले.तर देवराम मेंगाळ म्हणाले की, माझ्या घरकुल, रेशन कार्ड व इतर कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम मदत केली आहे. त्यांचे कार्यकर्ते ही कायम मदत करतात .अशा संकटकाळी त्यांनी मदत पाठवली. ते गोरगरिबांना सांभाळणारे नेते असल्याचे ते म्हणाले.या कुटुंबीयांच्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता व मदतीसाठी जनसेवक अविनाश आव्हाड हे प्रयत्नशील राहणार असून या कुटुंबाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यापुढेही मदत मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी जांबुत गावातील विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ही मदत मिळाल्याचे पाहून वारे कुटुंबीयांना भारावून आले.



