थोरात कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न
थोरात कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
थोरात कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

अमृतवाहिनीच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मणराव कुटे, सौ. शरयूताई देशमुख, ॲड.आर.बी.सोनवणे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, विलास वर्पे, नवनाथ आरगडे, अविनाश सोनवणे,सिताराम राऊत,वेल्हाळेचे सरपंच विष्णू आव्हाड, उपसरपंच सिताराम गुळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, अमृतवाहिनीच्या कृषी महाविद्यालयामुळे या परिसरामध्ये अद्यावत, सुंदर व सर्व सुविधायुक्त इमारतीसह नवीन विश्व उभे राहणार आहे. वसंतदादा पाटील यांनी अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेत विनाअनुदानित तत्वावर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आज महाराष्ट्रात शेकडो कॉलेज आहेत. अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेमधून आपला देशात ठसा उमटवला आहे. अमृतवाहिनीच्या विविध शाखांबरोबर आता नव्याने कृषी महाविद्यालय सुरू झाले आहे.

शेतकरी हा देशाचा पाया असून शेती क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन व्हावे,. कमी श्रमात जास्त उत्पादन याकरता नवीन तंत्रज्ञानाचा करणे गरजेचे आहे. याकरता या महाविद्यालयाच्या माध्यमातून नक्कीच मोठी मदत शेतकऱ्यांना होणार आहे. किंबहुना शेतकऱ्यांसाठी हे मार्गदर्शनाचे मोठे केंद्र कायम राहणार आहे.दुष्काळी संगमनेर तालुक्यात आज दररोज नऊ लाख लिटर दूध निर्माण होत आहे. याचबरोबर फळबागांसह पोल्ट्री व्यवसाय निर्माण झाला आहे. शेती, सहकार,ऊस,दूध, फळबागा, नगदी पिके यातून बाजारपेठ फुलली आहे. ही विकासाची वाटचाल कायम ठेवायची असून या महाविद्यालयातून नवीन संशोधनासाठी काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून दुष्काळी तालुका ते प्रगत तालुका अशी संगमनेर तालुक्याची ओळख निर्माण झाली. या मध्ये मोठा संघर्ष करून साहेबांनी 30 टक्के हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण पूर्ण केले त्यामुळे आज तालुक्यात शेती फुलली आहे. दूध व्यवसाय बरोबर पूरक व्यवसाय वाढले. चांगला दूध व्यवसाय,चांगली शेती,चांगली शिक्षण,चांगला तालुका अशी ओळख संगमनेरची राज्यात झाली असून या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी प्रयत्न करावा. याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावाचे माती परीक्षण करावे असे सांगताना हा तालुका लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मेहनतीतून उभा राहिला असल्याचे त्या म्हणाल्या.तर सौ.शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, कृषी क्षेत्रामध्ये इंजीनियरिंग कृषी आणि ए आय चा वापर आगामी काळात गरजेचा होणार असून या महाविद्यालयाच्या माध्यमातून हे काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी ॲड.नानासाहेब शिंदे, राजेंद्र चकोर, विष्णुपंत राठोड, रामहरी कातोरे,अजय फटांगरे, डी.एम.लांडगे, तानाजी शिरतार, गोरख सोनवणे, प्रा.बाबा खरात, डॉ.एम.ए.व्यंकटेश, प्रा.व्ही.बी.धुमाळ, डॉ जे बी गुरव, सौ जे बी सेटी, अंजली कन्नावार, जी.बी काळे, विलास भाटे, नामदेव गायकवाड, आदींसह अमृतवाहिनीच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख शिक्षक व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा.जी.बी.बाचकर यांनी आभार मानले. याप्रसंगी वेल्हाळे, सायखिंडी,मालदाड व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेशीम उद्योग केंद्र सुरू
रेशीम उद्योग हा कमी पाण्यावर होत असून तालुक्यामध्ये सध्या २०० एकर वर तुती लागवड करण्यात आली आहे. दुधामुळे तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. आगामी काळामध्ये रेशीम उद्योग हा सुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संपन्नता निर्माण करणारा मोठा व्यवसाय ठरेल. यासाठी मार्गदर्शन करण्याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात स्वतंत्र रेशीम उद्योग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.



