ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना निवडणूक बिनविरोध

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना निवडणूक बिनविरोध

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना निवडणूक बिनविरोध
संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची 2025-2030 या पंचवार्षिक कार्यकाळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर कारखान्यासह संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. सहकारातून ग्रामीण भागात सह शहरात समृद्धी निर्माण झाली असून संगमनेरचा सहकार हा देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते मात्र तालुक्यातील सभासद सर्वसामान्य नागरिक व जनतेने कायम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असून त्यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पद्धतीने तालुक्यातील 133 सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मात्र सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळांनी दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवत आपले अर्ज मागे घेतले होते. विरोधकांनी ही एक तालुका एक परिवार ही परंपरा जपत आपले अर्ज मागे घेतले.

नूतन संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे बिनविरोध निवडले आहे.तर साकुर गटातून – खेमनर इंद्रजीत अशोकराव, वरपे सतीश चंद्रभान , धुळगंड रामदास लक्ष्मण, जोर्वे गटातून- थोरात इंद्रजीत पंडितराव, डॉ .दिघे तुषार दिनकर, शिंदे विलास गंगाधर, तळेगाव गटातून गोडगे संपतराव श्रीरंगराव, कुठे रामनाथ बाळाजी, आरगडे नवनाथ धोंडीबा, धांदरफळ गटातून- घुले पांडुरंग दामोदर ,राहणे विजय रामनाथ ,हासे विनोद गणपत, अकोले जवळे  गटातून-देशमुख गुलाब सयाजी, हासे संतोष रखमा ,वाकचौरे अरुण  सोन्याबापू, अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून- भालेराव योगेश निवृत्ती तर महिला राखीव मतदार संघामधून- सौ गायकर लता बाबासाहेब व सौ डूबे सुंदरबाई रावसाहेब, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघामधून नागरी दिलीप श्रीहरी व इतर मागासवर्गीय मतदार संघामधून ताजने अंकुश बाळासाहेब यांची बिनविरोध निवड झाली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर विभागाचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी काम पाहिले.या बिनविरोध संचालक मंडळाचे महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा खेमनर, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, कारखान्याची विद्यमान चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात,शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिला अभंग, निखिल पापडेजा, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शेतकरी विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कारखान्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन- लोकनेते बाळासाहेब थोरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा राज्यातील उत्कृष्ट कारखाना असून सर्व सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व नागरिकांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे. संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. मात्र कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व सभासदांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे.चांगल्या राजकारणाची परंपरा या सर्वांनी जपली आहे .यापुढेही हीच समृद्ध वाटचाल ठेवून सर्वजण एकत्रित चांगले काम करतील अशी प्रतिक्रिया वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!