ब्रेकिंग

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात डेटा सायन्स या अभ्यासक्रमास शासनाची मान्यता

जाहिरात – 7756045359
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात डेटा सायन्स या अभ्यासक्रमास शासनाची मान्यता

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात डेटा सायन्स या अभ्यासक्रमास शासनाची मान्यता

संगमनेर । प्रतिनिधी । बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शासनाची कडून बी.एस्सी. डेटा सायन्स, एम. एस्सी. इन कॉम्प्युटर एप्लीकेशन तसेच बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स या वर्गाच्या अतिरिक्त तुकडीस मान्यता मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे.

जाहिरात – 7756045359

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य वाघ म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री महाविद्यालयाने सातत्याने गुणवत्तेतून आपला लौकिक निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये करिअरची संधी निर्माण करून दिली आहे. नवीन बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञान या अत्यंत गरजेचे आहे.यामधील डेटा सायन्स हा अभ्यासक्रम अभ्यासक्रम हा तीन वर्षाचा असून यासाठी महाविद्यालयाने अद्यावत प्रयोगशाळा देखील उभारली आहे. संगमनेर परिसरातील व ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने अत्यंत माफक फी मध्ये वरील अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा महाविद्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. डेटा सायन्स सारख्या अभ्यासक्रमात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होत आहेत.

(c)Nilesh Misal

अलीकडील बदलत्या काळात ए.आय व डेटा सायन्स यांचा प्रभाव वाढत असून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आय.टी.क्षेत्र, उद्योग, व्यवसाय, बँकिंग, शेती, मेडिकल  आदी क्षेत्रात ए.आय व डेटा सायन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या नवीन अभ्यासक्रमांसाठी संगमनेर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच रोजगाराभिमुख व कालसुसंगत आणि करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्याने संस्थेचे मार्गदर्शक माजीमंत्री बाळासाहेब थोरात,अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे, संस्थेचे सचिव सुमंत कोल्हे, सहसचिव.बाबुराव गवांदे, रजिस्टार उमेश डोंगरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!