कर्जदाराचे कर्जफेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा
कर्जदाराचे कर्ज फेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून श्री.बाबुराव एकनाथ नरोडे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे जामीनदार सुरेश बाबुराव नरोडे यांनी दिलेला रु.८ लाखाचा चेक न बटल्याने ज्योती पतसंस्थेने त्यांचेवर व रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.१९८/२०१७ दाखल केला होता.
कर्जदाराचे कर्जफेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा
त्यामध्ये चौकशी अंती आरोपी सुरेश बाबुराव नरोडे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधीश श्री. जी. डी. अग्रवाल साहेब यांनी आरोपीस १२ महिन्याचे साधा कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस रु. १५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम निकाल तारखेपासून ३० दिवसात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याचे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट श्री.एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.



