तालुक्यातील 2422 युवकांनी डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडून बांधल्या राख्या
रक्षाबंधन निमित्त ओवाळणीत आलेल्या 7226 वह्या गरीब विद्यार्थिनींना
तालुक्यातील 2422 युवकांनी डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडून बांधल्या राख्या

रक्षाबंधन निमित्त ओवाळणीत आलेल्या 7226 वह्या गरीब विद्यार्थिनींना
संगमनेर । प्रतिनिधी। भाऊ बहिणीच्या नात्याचा अत्यंत पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त संगमनेर तालुक्यातील 2422 युवकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी येऊन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याकडून राखी बांधून घेतली. याचबरोबर ओवाळणी मध्ये वही दिल्याने या वह्या गरीब विद्यार्थिनींना देणार असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.
शिवाजीनगर येथील सुदर्शन निवासस्थानी रक्षाबंधनानिमित्त युवकांची मोठी गर्दी होती. संगमनेर तालुक्यातील गावगावचे आणि शहरातील अनेक प्रभागांमधील तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.जयश्रीताई थोरात मित्र मंडळाच्या वतीने ओवाळणीच्या निमित्ताने कोणीही हार बुके न आणता एक वही आणावी असे आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील हजारो युवकांनी आपल्या सोबत एक वही आणत डॉ.जयश्रीताई थोरात यांना ओवाळणी टाकली.
रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील बहीण भावांच्या नात्याचा अत्यंत पवित्र सण आहे. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी महिला सबलीकरणाबरोबर युवकांसाठी मोठे काम केले असून हजारो युवकांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाठवल्या याचबरोबर अनेकांनी आपल्या लहान बहिणीसाठी वही पाठवली. महाराष्ट्रामध्ये अनेकांनी राख्या बांधून घेण्याचे विक्रम केले मात्र माय माऊली डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सलग सहा तास उभे राहून तालुक्यातील आलेल्या आपल्या कार्यकर्ते भावांना राखी बांधण्याचा विक्रम केला. 2422 युवकांनी राख्या बांधून घेतल्या याचबरोबर अनेकांनी शुभेच्छा पाठवल्या. याप्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भारतीय परंपरा ही अत्यंत समृद्ध आहे विविधतेने नटलेली आहे. बहिण भावाच्या नात्याचा हा पवित्र दिवस मोठ्या आनंदाने संगमनेर मध्ये साजरा होत आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समता,बंधुता आणि सर्वधर्मसमभाव जोपासत संगमनेर तालुका पुढे जात असून सर्व युवकांनी हीच परंपरा पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. ओवाळणी मध्ये आलेल्या सर्व वह्या ह्या तालुक्यातील गरीब विद्यार्थिनींना देण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक वही बहिणीसाठी
रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी मध्ये एक वही आणावी हे डॉ.जयश्रीताई थोरात मित्र मंडळांनी केलेल्या आव्हानाला युवकांनी मोठा प्रतिसाद दिल्या असून एक वही बहिणीसाठी या उपक्रमांतर्गत 7226 वह्या जमा झाले असून या वह्या तालुक्यातील गरीब विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे.



