ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व  -रणजीतसिंह देशमुख

राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व – रणजीतसिंह देशमुख
राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन
संगमनेर । प्रतिनिधी । शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे 9 लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असून भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी असे प्रतिपादन चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे

राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख की, मा कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध व्यवसायामुळे तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत झाली आहे. राजहंस दूध संघ हा गाईच्या दुधात राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जात असून दीपावली निमित्त दूध संघाने 41 कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक ,कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.

वसुबारस निमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे. तालुक्यात पशुधन मोठे असून दररोज सुमारे 9 लाख लिटर दूध निर्माण होत आहे. मोठ्या कष्टातून उभ्या असलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. भाकड जनावरं बाबत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी असून सरकारने या जनावरांसाठी प्रभावी उपाय योजना राबवली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.तर राजेंद्र चकोर म्हणाले की ,भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन ,विविध लसीकरण सातत्याने केले जात असून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असल्याचे ते म्हणाले यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!