हिवरगाव पावसा येथे नुकसानग्रस्त भागाची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाहणी
शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत मिळाली पाहिजे - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

हिवरगाव पावसा येथे नुकसानग्रस्त भागाची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाहणी


शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत मिळाली पाहिजे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

हिवरगाव पावसा येथे अचानक आलेल्या पावसाने शेडनेट कागद व घरांची मोठी नुकसान झाली या नुकसानीची मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली यावेळी समवेत डॉ. प्रमोद पावशे, डॉ. संदीप पावशे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.काल अचानक आलेल्या पावसाने हिवरगाव पावसामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पिकांसह शेडनेट कागद , घरांचे पत्रे व कौले यांची नुकसान झाले यामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलासा दिला.

यावेळी ते म्हणाले की यावर्षी 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे कारण राज्यामध्ये पशुधन मोठे आहे. पाणी व्यवस्थापन केले पाहिजे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता तातडीने मदत दिली पाहिजे. दुष्काळग्रस्त सर्व शेतकऱ्यांना एकरी मदत देताना कोणत्याही पंचनामा नको सरसकट आणि मोठी मदत द्या जेणेकरून अशा संकट काळामध्ये शेतकरी उभा राहील.शेतकरी मोठ्या कष्टातून पीक उभे करतो मात्र पावसा अभावी पिके वाया गेली आहेत. काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे शेतकऱ्यांनी ही अशा संकट काळामध्ये ठाम उभे राहावे याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याबरोबर सरकारने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत करावी अशी मागणी मा महसूल बाळासाहेब थोरात यांनी यावेळेस केली आहे.मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या भेटीनंतर सदर नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.



