ब्रेकिंग
काँग्रेसच्या आंदोलनामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया

काँग्रेसच्या आंदोलनामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया


शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉक मधून 350 मे .टन युरिया मिळणार
संगमनेर । प्रतिनिधी । राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉक मधून युरिया मिळावी याकरता आंदोलन केले होते या मागणीची दखल घेऊन सरकारकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना 350 मे टन युरिया युरिया मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सध्या खरीप हंगाम सुरू असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका सोयाबीन बाजरी यांसह विविध पिकांची पेरणी केली आहे. काही भागांमध्ये पेरणी सुरू आहे. या पिकांसाठी युरिया खत गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची युरियासाठी सातत्याने मोठी मागणी होती. मात्र युरिया मिळत नव्हती म्हणून संगमनेर तालुका काँग्रेस व तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 14 जुलै 2026 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांना शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाच्या बफर स्टॉक मधून युरिया मिळावी अशी आग्रही मागणी केली.यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून युरिया पुरवण्यातील अशी गाही कृषी अधिकाऱ्यांनी दिली होती.यानंतर आज संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026- 27 मधील उपलब्ध संरक्षित साठ्या मधून 349.52 मे टन युरिया कृषी विक्रेत्यांकडे देण्यात आली आहे.दोन दिवसापासून तालुक्यात रिमझिम पावसाने सुरुवात केली असून अत्यंत महत्त्वाच्या वेळेस शासनाकडून बफर स्टॉक खुला झाल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळणार आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिला असून सर्व शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात तातडीने आणि सहजरित्या युरिया मिळाली पाहिजे अशी मागणी गुंजाळवाडीचे सरपंच तसा प्रगतशील शेतकरी नरेंद्र गुंजाळ यांनी केली आहे.
माजी मंत्री थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सर्व सुविधा सहज उपलब्ध
महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्य काळामध्ये शेतकरी बांधवांना युरियासह सर्व सुविधा व शासकीय योजनांचा सहजपणे लाभ मिळत होता मात्र मागील दोन वर्षापासून जाणीवपूर्वक संगमनेर तालुक्याला डावलले जात असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे काँग्रेसच्या आंदोलनातून थोड्या प्रमाणात युरिया उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून या पुढील काळात शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी युरिया द्यावी अशी आग्रही मागणी वाघापूर येथील नामदेव शिंदे यांनी केली आहे.



