ब्रेकिंग

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग जनतेच्या हक्काचा – आमदार सत्यजित तांबे

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची महाराष्ट्राला सावत्र वागणूक

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग जनतेच्या हक्काचा – आमदार सत्यजित तांबे

जाहिरात मो-7756045359
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची महाराष्ट्राला सावत्र वागणूक
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या उद्योग ,शिक्षण, कृषी आणि रोजगार क्षेत्राला गती देण्याची क्षमता असलेला पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्ग हा प्रकल्प साकारण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या भागातील जनतेने मोठा पाठपुरावा केला आहे. मात्र केंद्राच्या नव्या निर्णयाने हा मार्ग डावलून आता अहमदाबाद धानोरा रेल्वे मार्गाला पहिला सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग म्हणून प्राधान्य दिले आहे यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग होतो की नाही ही शंका निर्माण झाल्या असून हा मार्ग या भागातील जनतेच्या हक्काचा असल्याने या रेल्वे मार्गासाठी संघर्ष करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे

नाशिक पुणे रेल्वे ऐवजी गुजरात मधील अहमदाबाद धोलेरा या पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे बाबत मागणी करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.यावेळी ते म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग असलेला नाशिक पुणे रेल्वे नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर चाकण पुणे या मार्गाने मंजूर केला. 2018 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. या मार्गासाठी संगमनेर तालुक्यासह जुन्नर तालुक्यातील आज जमिनीचे अधिग्रहणही करण्यात आले. सुमारे 230 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले. रेल्वे संगमनेर या सरळमार्गे होणार असल्याने या भागातील नागरिक शेतकरी व युवक वर्ग मोठा आनंदित होता.मात्र मध्यंतरी सरकारने शिर्डी अहिल्यानगर आणि पुणे असा मार्ग केल्याने या मार्गावरील सर्व तालुक्यांमध्ये मोठी नाराजी पसरली. सर्व लोकप्रतिनिधी सह सर्वांनी एकत्रित येऊन संघर्ष केला. याबाबत लोकनेते मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याबाबत विनंती केली. त्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. आपण वेळोवेळी विधानपरिषदेमध्ये नाशिक रेल्वे बाबत आवाज उठवला. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन हा मार्ग सरळ मार्गे व्हावा यासाठी सरकारला विनंती केली .

मात्र आता केंद्र सरकारने नव्याने राज्यात होणाऱ्या पुणे नाशिक पहिल्या सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या ऐवजी गुजरात मधील अहमदाबाद ते धोलेरा या 130 किलोमीटर मार्गासाठी सुमारे 20,667 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग गुंडाळला जातो की काय अशी शंका सर्व नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा संगमनेर सरळ मार्गे झाला पाहिजे ही आमची आग्रही मार्गी असून यातून या विभागातील आसपासच्या सर्व तालुक्यांमधील ही विविध क्षेत्राला प्रगतीला गती मिळणार आहे. त्यामुळे हा मार्ग होण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!