ब्रेकिंग

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत निवड

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत निवड
जाहिरात मो-7756045359
सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत निवड
कोपरगांव । प्रतिनिधी । कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची सैन्य दल आणि पोलीस दलात निवड झाली असून यामध्ये दोन विद्यार्थीनींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत घेवून हे यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी नेहमीच योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या मार्गदर्शनाच्या मदतीने स्वतःच्या कष्टाचा योग्य मेळ घालत महाविद्यालयातील विद्यार्थी रमेश घोडेराव याने देशसेवेचे आपले स्वप्न साकार केले असून त्याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.वृषाली वाघ हिचे नागपूर ग्रामीण पोलीस दल आणि कु.आरती कलोर हिची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. या दोन्ही रणरागिणींचे खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,  संस्था निरीक्षक नारायण बारे, महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर  मिळवलेले हे यश केवळ महाविद्यालयाचा लौकिक वाढवणारे नसून परिसरातील इतर तरुण-तरुणींना शासकीय सेवा आणि देशसेवेमध्ये जाण्यासाठी मोठी प्रेरणा देणारे आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!