शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळावे


नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळावे
तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, प्रभाकर कांदळकर बीआर चकोर रामहरी कातोरे संपतराव गोडगे ,हौशीराम सोनवणे ,अविनाश सोनवणे, नवनाथ आरगडे, गुलाबराव देशमुख, रामनाथ कुटे ,अरुण वाकचौरे ,योगेश भालेराव, विलास शिंदे, डॉ तुषार दिघे, विजय राहणे, मदन आंब्रे, बाबासाहेब गायकर रावसाहेब दुबे, भारत मुंगसे, बाबासाहेब कांदळकर यांच्यासह तळेगाव भागातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. संगमनेर तालुक्यामध्ये दररोज साधारण नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून यामुळे गरीब कुटुंबांमध्ये आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. याचबरोबर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले असून सभासद शेतकरी ऊस उत्पादक कामगार व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. एकरी शंभर एकर ऊस उत्पादन घेण्यासाठी काम करावेशेतकरी हा जगाचा पोशिंदा असून नवीन सरकारने सत्तेवर येताना मोठमोठी आश्वासने दिली आहेत. सध्या देशामध्ये महागाई बेरोजगारी वाढली आहे . पिकाला हमीभाव नाही,कांद्याला भाव मिळत नाही. पिक विमा मिळाला नाही. सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला मदत करण्याची सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. महाविकास आघाडी सरकारने विनाअट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती त्यावेळेस महागाई कमी होती. मात्र सध्या महागाई भरमसाठ वाढल्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी किंवा कमीत कमी 7 लाख रुपये कर्जमाफी मिळावी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळावे अशी मागणी त्यांनी केली. चेन्नई सुरत ग्रीन फील्ड महामार्गाबाबत आपण शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला पाहिजे ही आपली आग्रही मागणी आहे असेही ते म्हणाले. यावेळी परिसरातील शेतकरी कार्यकर्ते ऊस उत्पादक नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



