ब्रेकिंग

TISS सारखे राज्यातील रुग्णालयांचे गुणवत्ता ऑडिट करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सकारात्मक प्रतिसाद; अंमलबजावणी करण्याची दिली ग्वाही

TISS सारखे राज्यातील रुग्णालयांचे गुणवत्ता ऑडिट करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी

जाहिरात मो-7756055359

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सकारात्मक प्रतिसाद; अंमलबजावणी करण्याची दिली ग्वाही

मुंबई । प्रतिनिधी । राज्यातील शासकीय तसेच जनआरोग्य योजनेंतर्गत कार्यरत रुग्णालयांच्या सेवांचे स्वतंत्र संस्थेमार्फत नियमित गुणवत्ता ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान केली.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) किंवा तत्सम नामांकित संस्थेमार्फत हे ऑडिट केल्यास आरोग्य सेवेतील त्रुटी दूर होऊन दर्जेदार सेवा देण्यास मदत होईल, असे त्यांनी सभागृहात मांडले.तांबे यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयांचे ऑडिट प्रामुख्याने शासकीय यंत्रणेमार्फत होत असल्याने त्याऐवजी स्वतंत्र आणि विश्वासार्ह संस्थेकडून नियमित ‘गॅप ऑडिट’ झाल्यास रुग्णालयांतील उणिवा, सेवा गुणवत्ता आणि आवश्यक सुधारणांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होऊ शकेल. त्यातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तांबे यांच्या मागणीचे स्वागत करत, टीआयएसएससारख्या संस्थेमार्फत आरोग्य यंत्रणेचे गुणवत्ता ऑडिट करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले. या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!