ब्रेकिंग

अण्णांच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांची रुग्णालयात धाव; डॉक्टरांशी चर्चा

अण्णांच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांची रुग्णालयात धाव; डॉक्टरांशी चर्चा

जाहिरात मो-7756045359
अण्णांच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांची रुग्णालयात धाव; डॉक्टरांशी चर्चा

मुंबई । प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे यांची रुग्णालयात जाऊन जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबतही त्यांनी डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची तब्येत बिघडल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेत उपचारांबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली. यापूर्वी मंत्री विखे पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन त्‍यांच्‍या तब्‍येतीची विचारपुस केली होती.काल त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने मुंबई येथे हलविल्याचे वृत्त कळल्यानंतर, मंत्री विखे पाटील यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन अण्णांच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!