ब्रेकिंग

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात १० दिवसांचे भव्य विशेष मोफत आरोग्य शिबीर

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात १० दिवसांचे भव्य विशेष मोफत आरोग्य शिबीर

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात १० दिवसांचे भव्य विशेष मोफत आरोग्य शिबीर

लोणी । प्रतिनिधी । प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या संस्थापक सिंधूताई विखे पाटील यांच्या जयंती निमित्ताने प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रूग्णालय (पीएमटी) येथे बुधवार दि. २ सप्टेंबर ते शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दहा दिवसांचे भव्य विशेष मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. यापुर्वी १५ दिवसांचे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. परंतू खास लोकआग्रहास्तव शिबीराचा आणखी दहा दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या मोफत शिबीराचा लाभ ॲडमीट रूग्णांनाच घेता येईल. जे रूग्ण ॲडमीट झाले आहेत अशा सर्व रूग्णांच्या सर्व नियमीत प्रयोगशाळा तपासण्या मोफत केल्या जातील. नियमीत सोनोग्राफी, एक्सरे मोफत केल्या जातील, तसेच प्लेन सीटीस्कॅन या तपासणीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच शिबीरासाठी मंजूर यादीतील औषधे मोफत दिली जाणार आहेत. याबरोबरच ॲडमीट झालेल्या रूग्णांना चहा, नाश्ता व जेवणाची मोफत सुविधा दिली जाणार आहे. तरी गरजू रूग्णांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन आरोग्याची तपासणी आणि उपचार करून घ्यावेत. या संधीचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रूग्णालय प्रशासक संचालक डॉ. योगींदर सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. संपर्क क्रमांक ०२४२२-२७१४२०, ०२४२२-२७३६००.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!