ब्रेकिंग

शहापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. कविता घारे यांची बिनविरोध निवड

शहापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. कविता घारे यांची बिनविरोध निवड

शहापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. कविता घारे यांची बिनविरोध निवड

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सौ. निशा खंडीझोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. कविता अंकुश घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.शहापूर ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच सौ. योगिता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सौ. कविता घारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक शिवाजी सोमवंशी यांनी सौ. कविता घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी सरपंच, सर्व सदस्य, काळे गटाचे कार्यकर्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी. व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. कविता घारे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच सौ. योगिता डांगे, मावळत्या उपसरपंच सौ. निशा खंडीझोड, सर्व ग्रा.प.सदस्य, सागर घारे, रामनाथ घारे, राजेंद्र पाचोरे, रमेश डांगे, वसंत पाचोरे, जनार्दन पाचोरे, अशोक डांगे, गणेश घारे, पोपट घारे, वाल्मिक घारे, गोविंद पाचोरे, अंकुश घारे, नवनाथ डांगे, सुनीता डांगे आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व शहापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सौ. कविता घारे यांची मा. आ. अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपसरपंचपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच सौ. कविता घारे यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. ज्या विश्वासाने माझ्यावर उपसरपंचपदाची जबाबदारी सोपविली त्या विश्वासाला तडा जावू न देता सरपंच, सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून शहापूर ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवेल व टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!